मुलुंड मध्ये दोन अल्पवयीन मुलांनी चाकूने भोसकून मित्राची हत्या
मुलुंड मध्ये दोन अल्पवयीन मुलांनी चाकूने भोसकून मित्राची हत्या मुलुंड पश्चिम येथे दोन अल्पवयीन मुलांनी चाकूने भोसकून मित्राची हत्या केल्याचा गंभीर प्रकार आज मंगळवार दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी घडली असून आता या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक करून डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हत्येनंतर दोन चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.