निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांविरोधात अनोखे आंदोलन! थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कुत्रे नेले
नाशिकच्या निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येविरोधात युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधावे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान चार ते पाच मोकाट कुत्र्यांना थेट मुख्य अधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात नेण्यात आले.
निषेधाचे प्रतीक म्हणून अधिकाऱ्यांच्या टेबलावर नोटांचा हार ठेवण्यात आला. आंदोलकांचा आरोप आहे की, निफाड शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, लहान मुले, महिला, वृद्ध आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा दावा करत, तक्रारी करूनही प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
🚨 मोकाट कुत्र्यांना घेऊन थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात!
🐕 निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांविरोधात अनोखे आंदोलन
#Niphad #Nashik #StrayDogs #NiphadNews #YuvaSena #VikramRandhave #NagarPanchayat #NashikNews #MaharashtraNews #Protest #BreakingNews
Pune City, Pune | Sep 17, 2026