‘जरांगे अन् शिंदेंमधील विसंवाद दूर होईल’! प्रताप सरनाईकांचं मोठं विधान
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील विसंवाद लवकरच दूर होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूंमधील अंतर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मनोज जरांगे त्यांना दिवसातून दोन-तीन वेळा फोन करून कामे सांगतात आणि एसटी महामंडळाशी संबंधित मागण्यांवर आपण काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच जरांगे यांनी एकनाथ शिंदेंबाबत काही बोलले तरी आपण आपल्या नेत्याचा आदर करतो, असे सरनाईक म्हणाले.
🚨 ‘जरांगे-शिंदेंमधील विसंवाद दूर होईल!’
🔥 प्रताप सरनाईकांचं मोठं विधान
📞 ‘जरांगे मला दिवसातून दोनदा फोन करतात’
🗣️ ‘लवकरच संभ्रमाचं वातावरण दूर होईल’
#PratapSarnaik #ManojJarangePatil #EknathShinde #MarathaReservation #MarathaAndolan #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalNews #MarathaNews #BreakingNews
Pune City, Pune | Sep 17, 2026