‘जरांगे नावाचा पोपट कधीच संपलेला होता!’ लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका
मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा ‘पोपट आधीच मेलेला होता’, मात्र महाराष्ट्रातील काही नेत्यांनी त्याला खतपाणी घालून जिवंत ठेवल्याचा दावा हाके यांनी केला.
जरांगे मुंबईला जाणार नसल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते, असा उल्लेख करत मुंबईत प्रतिसाद मिळणार नाही या भीतीने आंदोलन मागे घेतल्याचा दावा हाके यांनी केला. तसेच त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला ‘रियालिटी शोचा फिनाले’ असेही संबोधले.
🔥 ‘जरांगे नावाचा पोपट कधीच संपलेला होता!’
⚡ लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर जोरदार टीका
🎤 ‘मुंबईला जाणार नाही’ हाके यांचा दावा
🚨 आंदोलन मागे घेताच हाकेंचा जरांगेंवर निशाणा
#LaxmanHake #ManojJarangePatil #MarathaReservation #OBC #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MarathaAndolan #PoliticalNews #BreakingNews #JarangePatil
Pune City, Pune | Sep 17, 2026