नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला.
निफाड नगरपंचायतीतील काही नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना पोत्यात भरून थेट मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात नेले. त्यानंतर त्यांनी कुत्र्यांना अधिकाऱ्यांच्या टेबलवरच सोडून दिले.
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांना होत असलेल्या त्रासावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कुत्रे आणून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
#NashikNews #StrayDogs #MaharashtraNews #Niphad #ViralNews
Pune City, Pune | Sep 17, 2026