हिंगणा: हिंगण्यात कामगाराचा अपघाती मृत्यू
Hingna, Nagpur | Jul 12, 2026 12 जुलैला रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जबलपूर-अमरावती रोडवरील एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत असताना, ३८ वर्षीय मोहम्मद मसाऊद मोहम्मद रिझवान या मजुराच्या अंगावर ३ टन वजनाचा लोखंडी गोळा पडला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला एम्स हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. हिंगणा पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.