रामटेक: मनसर कांद्री आरटीओ चेक पोस्ट वर एसीबीच्या कारवाईत दोघे ताब्यात
Ramtek, Nagpur | Mar 12, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर जवळील कांद्री (मनसर )आरटीओ चेक पोस्ट येथे लाच लुचपत प्रतिबंधक नागपूरच्या पथकाने कारवाई करीत मोटर वाहन निरीक्षक व एजंटला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार दिनांक 11 मार्चला रात्री करण्यात आली. या कारवाईत मोटर वाहन निरीक्षक अभिजीत मधुकर टाले यांच्या अखत्यारितील खासगी एजंट सुशील विनोद रामटेककर याला एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना पंचायत समक्ष रंगेहात पकडण्यात आले .