उरण: उरण-पनवेल मुख्य रोड मृत्यूचा सापळा
Uran, Raigad | Jun 3, 2026 उरण-पनवेल या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी तेलीपाडा आणि नवीन शेवा गावच्या हद्दीतील गतिरोधक गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत धोकादायक बनले आहेत. या मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांना लागूनच मोठे खड्डे पडले असून, विशेषतः तेलीपाडा येथील एका गतिरोधकाच्या बाजूला पाइपलाइन टाकताना खोदलेला मोठे चर कंत्राटदाराने तसेच ठेवून दिले आहेत. हे खट्टे आणि चर चुकवण्याच्या नादात समारून येणाऱ्या वाहनांशी थेट धडक होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.