मुंबई उपनगर: सेवा संकल्प अभियानातून राज्यात ॲनिमिया निर्मूलन व आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सेवा संकल्प अभियानाद्वारे ॲनिमिया निर्मूलन, बाल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. हे कार्य सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांनी समन्वयाने करावे, असे देखील सांगितले आहे.