सावनेर: धामण सापांच्या जोडीला सुरक्षित जीवनदान, सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे भीतीचे वातावरण निवळले
Savner, Nagpur | Jul 8, 2026 खापरखेडा येथील शेतकरी अशोक बसूले यांच्या शेतात धामण प्रजातीचे दोन साप नैसर्गिक प्रजनन प्रक्रिये दरम्यान दिसून आले दिसून आले अचानक शेतात साप दिसल्यामुळे तिथे काम करणाऱ्या मजुरांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती सर्पमित्र दद्दू गणवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आली माहिती मिळताच सर्पमित्र तातडीने घटनास्थळी पोहोचले