Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उरण: धरण उशाशी आणि कोरड आदिवासींच्या घशाशी

Uran, Raigad | May 16, 2026
उरण तालुक्यात मे महिन्याची चाहूल लागताच रखरखत्या उन्हामुळे ग्रामीण भागात पाण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. तालुकयातील आठ वाड्या सध्या अधिकृतपणे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्या असून यामध्ये रानसई ग्रामपंचायतीच्या सहा आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या दोन वाड्यांचा समावेश आहे. विशेष खेदजनक बाब म्हणजे, ज्या रानसई धरणातून संपूर्ण उरण तालुक्याची तहान भागवली जाते, त्याच धरणाच्या उशाशी असलेल्या आदिवासी वाड्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे.