उरण: मुख्य पोस्ट ऑफिस अखेर उरणमध्येच
Uran, Raigad | May 22, 2026 गेल्या वर्षभरापासून उरणबाहेर असलेल्या पोस्ट ऑफिसमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणाऱ्या उरणमधील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. जेएनपीटी कामगार वसाहतीत स्थलांतरित करण्यात आलेले मुख्य पोस्ट ऑफिस आता पुन्हा एकदा उरण शहरात सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीला आणि आंदोलनाला अखेर यश आले असून, शहरात पोस्ट ऑफिस परतल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.