जेजुरीत माउलींच्या पालखीचे उत्साहात आगमन; भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरण
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे आज जेजुरी येथे उत्साहात आगमन झाले. यावेळी वारकऱ्यांवर सोन्यासारख्या भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने अवघी जेजुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी होत भक्तिभावाने माउलींचे दर्शन घेत पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.
Kalyan, Thane | Jul 13, 2026