मुरुड: सात वर्षांनंतरही काशिदच्या अत्याधुनिक जेट्टीचे काम रखडले
Murud, Raigad | Apr 29, 2026 मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावरील जेट्टीचे काम सध्या रखडले आहे. या जेट्टीमुळे मुंबईतील नागरिका आणि पर्यटक यांना जलमार्गे दोन तासात मुरुड गाठता येणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रवासातील एक तास वाचणार आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या जेट्टीचे काम लवकर पूर्ण आवश्यक आहे. जेट्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी मुरुडकर करीत आहेत.