मुरुड: जळगावच्या तरुणाचा काशीद बीचवर बुडून मृत्यू
Murud, Raigad | Jun 11, 2026 मुरुडनजीक काशीद बीचवर सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले. अमीन मजीद शेख (वय २५), मलिक नजीर शेख (वय २१) आणि इम्रान अन्वर खान (वय ३७, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरुड परिसरात आले होते. मोकळ्या वेळेत ते काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले असता अमीन आणि मलिक हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले.