जाफराबाद: जाफराबाद तहसील कार्यालयावर सकल बौद्ध समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले थाली बजाव आंदोलन
आज दिनांक 15 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील तहसील कार्यालयावर जाफराबाद शहरासह परिसरातील व तालुक्यातील सकल बौद्ध समाज बांधवांच्या वतीने थाली बजाव आंदोलन करण्यात आली आहे या आंदोलनाचे कारण म्हणजे राज्य सरकार अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण करण्याच्या विचारात आहे व तशा हालचाली सध्या सुरू आहे, मात्र याला सकल बोद्ध समाज बांधवांनी विरोध करत आरक्षण वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने हे आंदोलन केले आहे.