सेलू: फुलझाडे व भाजीपाला शेळ्यांनी खाल्ल्याच्या कारणावरून रमना येथे दोघांनी एकास केली मारहाण, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Nov 10, 2024 घरी लावलेली फुलझाडे व भाजीपाला शेळ्यांनी खाल्ल्यावरून झालेल्या भांडणात दोघांनी एकास बदडले. ही घटना ता. 8 शुक्रवारला सकाळी 7 वाजता तालुक्यातील रमना येथे घडली. याप्रकरणी विनोद नामदेव येळणे रा.रमना यांनी बिरजू कवरे व अमोल कवरे रा. रमना यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती ता. 10 ला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.