सेलू: केळझर शिवारात 1 महिन्याच्या निलगाईच्या पिलाला युवकांनी दिले जीवनदान
Seloo, Wardha | Nov 9, 2024 झुडपात दडून बसलेल्या निलगाईच्या 1 महिन्याच्या बछड्याला युवकांनी सुरक्षित रेस्क्यू करून पोलीस व वन विभागाच्या स्वाधीन करून जीवन दान दिले. ही घटना ता. 8 शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता केळझर शिवारात दफ्तरी पेट्रोल पंपाजवळ घडली. अशी माहिती ता. 9 ला वन विभाग सेलू कडून मिळाली.