सेलू: जामनी येथे क्षुल्लक कारणातून काठीने मारून केले जखमी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 10, 2024 काहीही कारण नसतांना वाद करून एकास डोक्यावर व हातावर काठिने मारून जखमी केले. सूर्यकांत वसंतराव कळमकर वय 31 रा. जामनी असे जखमीचे नाव आहे. ही घटना ता. 10 रविवारी सकाळी 9.30 वाजता तालुक्यातील जामनी येथे घडली. याप्रकरणी प्रमोद रमेश वाघमारे रा. जामनी याचे विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.