महाड: बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
Mahad, Raigad | Apr 13, 2026 किल्ले रायगडावरील सुरू असलेल्या कामांसाठी लागणारे साहित्यांची वाहतूक करणाऱ्या गाढवांपैकी पाच ते सहा गाढवांचा मृत्यू झाला आहे. या गाढवांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर या मृत गाढवांना कोंझर घाटात उघड्यावर टाकण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.