नागपूर शहर: नागपूर मनपामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा,महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नागपूर महानगरपालिका मुख्यालयात महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते देशाच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने नागपूर शहराचा विकास वेगाने होत असून विकासाचा अनुशेष झपाट्याने कमी होत असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. मालमत्ता कर वसुली सुलभ करण्यासाठी कर संग्राहकांना नवीन पॉस मशीनचे वितरण करण्यात आले.