पोलादपूर: नातवाने आजीचा खून करुन मृतदेह १०० फूट खोल दरीत फेकला
आंबेनळी घाट परिसर पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. अलिबाग येथील एका नराधम युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी संशयित आरोपी नातवाला ताब्यात घेतले असून, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सने गुरुवारी (दि.४) भर पावसात धाडसी मोहीम राबवून १०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला.