रामटेक: पिपरीया - वाघोली येथे दुरुस्तीचे कार्य करीत असताना विद्युत खांबावरून पडून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Mar 16, 2026 रामटेक तालुक्यातील पिपरिया - वाघोली येथे विद्युत महावितरण अंतर्गत दुरुस्तीचे कार्य करीत असताना एका 32 वर्षीय कंत्राटी कामगाराचा पोलवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 16 मार्चला सकाळी आठ वाजता च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.मृतकाचे नाव सेवकराम कोठीराम मलघाम, वय 32 वर्ष राहणार डोंगरताल असे आहे.