धुळे: नकाने तलाव भरला तुडुंब 217 एमसीएफटी इतका जलसाठा धुळेकरांना मिळणार लवकरात लवकर एक दिवसाआड पाणी.
Dhule, Dhule | Aug 30, 2024 गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील सर्व जलसाठे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे आता पुढील काळात धुळेकरांची तहान भागणार आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव हा 217 एमसीएफटी इतका पाणी साठा असून नकाने तलाव आतापर्यंत 85 टक्के भरले आहे. त्यामुळे धुळेकरांना मिळणारे आठ दिवसाआड पाणी आता एक दिवसाआड मिळणार.