धुळे: श्री संत सेनाजी महाराज यांचा पुण्यतिथी निमित्त केशव गार्डन परिसरातून भव्य मिरवणुकीच्या आयोज
Dhule, Dhule | Aug 30, 2024 धुळे शहर नाभिक समाजाने आपल्या आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली. या निमित्ताने शहरात पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरात असलेल्या केशव गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सेनाजी महाराजांच्या पालखीचे पूजन करून पालखी मिरवणूक काढण्यात आली.