धुळे: विटापट्टी परिसरात एआयएमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नासिर पठाण यांच्या हस्ते रस्ता कामाचे शुभारंभ
Dhule, Dhule | Aug 30, 2024 देवपूर प्रभाग क्रमांक तीन विटापट्टी परिसरात धुळे शहराचे आमदार फारुक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नगरसेवक प्रतिनिधी तथा एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष नासिर पठाण यांच्या हस्ते रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभाग क्रमांक तीन विटा भट्टी परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती.