धुळे: धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस काका व पोलीस दीदींसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न
Dhule, Dhule | Aug 30, 2024 महाराष्ट्र पोलीस दलातर्फे संपूर्ण राज्यात शालेय विदयार्थी व विदयार्थीनी यांचेसाठी पोलीस काका व पोलीस दिदी ही संकल्पना अंमलात आणली आहे, सध्या महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये लहान मुलींवर लैगिंक अत्याचाराच्या निंदनीय घटना घडत आहेत, त्यामुळे पालकवर्गात अस्वस्थता पसरलेली असल्याने सध्याची परिस्थिती लक्षात घेता, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.