उरण: भोंदू खरातच्या पत्नीचा उरणमधील जमीन व्यवहार रद्द
Uran, Raigad | Apr 25, 2026 महिलांच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप असलेला नाशिकचा कुप्रसिद्ध भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कमाईचा नवा पुरावा रायगड जिल्ह्यात उरणमध्ये समोर आला आहे. खरातची पत्नी कल्पना खरात हिने उरणच्या चाणजे परिसरात 20 गुंठे जमीन संशयास्पदरितीने खरेदी केल्याचे उघड झाले असून, उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी हा बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहार रद्द केला आहे.