काटोल: कोंढाळीत दुकान फोडणारा फरार आरोपी १२ तासांत गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Katol, Nagpur | Apr 10, 2026 कोंढाळी येथील एका पानठेल्याचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी पंकज मोहन बांगरे (वय २२, रा. सुकळी) याला स्थानिक गुन्हे शाखेने केवळ १२ तासांत अटक केली आहे.९ एप्रिल रोजी रात्री गस्त घालत असताना कोंढाळी पोलिसांनी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना रंगेहात पकडले होते, मात्र पंकज अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. विशेष म्हणजे, हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.