बदनापूर: कॅनरा बँकेत बँक मॅनेजर व सहकाऱ्यांनी केला कोटींचा अपहार,गुन्हा दाखल,पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी दिली पो.ठाणे येथे माहिती
Badnapur, Jalna | Apr 25, 2026 आज दिनांक 25 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की बदनापूर शहरातील कॅनरा बँक व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर संजय डोंगरे प्रवीण बोराडे यांनी खोट्या सोन्याला खरे दाखवत बँकेची 7कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केली आहे,त्याबद्दल बँकेचे महाव्यवस्थापक केशव मूर्ती यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.