शहादा: ब्राह्मणपुरी जिल्हा परिषद केंद्र शाळा अंतर्गत सुलतानपूर- कुरंगी आधी गाव परिसरात मतदार जनजागृती
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी जिल्हा परिषद केंद्र शाळेअंतर्गत स्वीप अर्थात मतदार जनजागृती या अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नंदुरबार यांच्या सूचनांन्वये केंद्रातील ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, सुलवाडे ,गोदीपूर ,नवे गोदीपूर ,कोचरा ,खेडदिगर, चांदसैली ,बिलाडी ,कुरंगी, रायखेड, या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व केंद्रातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची भव्य रॅली गावपातळीवर काढून जनजागर करण्यात आला.