काटोल: एसबीएल स्फोट: आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू, मृतांची संख्या २७ वर
Katol, Nagpur | May 5, 2026 राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी स्फोटक कंपनीत** १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमी दुर्गा मनोज घाडगे (३३ वर्षे) यांचे उपचारादरम्यान चार मे ला सकाळी सात वाजता निधन झाले. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या.मूळच्यामन्नातखेडी येथील रहिवासी असलेल्या दुर्गा यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुली आहेत. त्यांच्या निधनाने मृतांची एकूण संख्या २७ झाली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.