मुरुड: राजा हंबीरराव यांचा शिलालेख सापडला
Murud, Raigad | Apr 27, 2026 नांदगाव येथील भवानी पाखाडी येथे रहिवाशी जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांचा दुर्मिळ शिलालेख सापडला आहे. या शिलालेखाचे वाचन मुरूडचे इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांनी केले. चोरघे कुटुंबीयांच्या वाडीला जलसिंचन करण्यासाठी विहीर आहे. इ.स. 2000 च्या सुमारास विहिरीतील गाळ काढताना एक मोठी शिळा सापडली. ही शिळा विहिरीतून बाहेर काढून विहिरी लगतच ठेवण्यात आली.