म्हसळा: म्हसळा नगरपंचायत शिवसेनेच्या नगरसेवकांना खासदार सुनिल तटकरे यांचा सल्ला
Mhasla, Raigad | May 5, 2026 म्हसळा नगरपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ७नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. नंतर बऱ्याच राजकीय व कायदेशीर घडामोडी घडल्या आणि त्या नगर सेवकांना अपात्र ठरविण्यात आले. दि.२५ एप्रिल रोजी त्या अपात्र नगरसेवकांनी सुतारवाडी येथे माझी भेट घेऊन आम्हाला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घ्या. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करण्यास तयार आहोत अशी विनंती केली होती परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही मला फसवलेत पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फसवू नका.