नागपूर शहर: गुन्हे शाखा युनिट 4 ची धडक कारवाई: १२ टनहून अधिकचा धातूचा मुद्देमाल जप्त
20 आगस्ट ला दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने धडक कार्यवाही करत लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनरमध्ये अवैधरीत्या गोळा केलेला १२ टन ४०० किलो लोखंडी, अल्युमिनियम व मिश्र धातूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कंटेनरसह एकूण ६१,६४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा साठा दिल्ली येथे पाठवण्याच्या तयारीत होता.याप्रकरणी गजानन घनश्यामजी महाजन, जयंतकुमार चंद्रमोहनजी बरवाड, मोहम्मद अफराज फिरोज शेख आणि मोहम्मद युसुफ मोहम्मद हनिफ यांच्यावर कारवाई