नागपूर शहर: नागपुरात गोदामात झालेली चोरी तीन तासात उघड; चार आरोपी अटकेत, कोतवाली पोलिसांची कार्यवाही
14 ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या तीन तासांत पर्दाफाश केला असून, चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला सुमारे १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी इमामवाडा येथील एका घरी धाड टाकली. तेथे चार संशयित आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरी केलेले वायरचे बंडल आणि गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्ष