महाड: बिरवाडी परिसराला अवकाळी वादळी पावसाचा तडाखा
Mahad, Raigad | May 8, 2026 मागील महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेने त्रस्त झालेल्या बिरवाडी परिसराला गुरुवारी (दि. ७) अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने जोरदार झोडपले. या वादळी पावसामुळे खरवली आणि सोलम कोंड परिसरातील पाच नागरिकांच्या घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत तहसीलदार महेश शितोळे यांनी नुकसानग्रस्त घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले असल्याचे सांगितले.