शहादा: कलमाडी शिवारातून विद्युत तारांसह दोन पोल असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला, शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील कलमाडी शेत शिवारातून विद्युत तारांसह दोन लोखंडी पोल असा एकुण ५० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रदिप रणजितसिंग गिरासे यांच्या फिर्यानुसार ३ एप्रिल रोजी दुपारी शहादा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलमाडी-बोरद शिवारातून ४० हजार रुपयांची दोन हजार ५०० मीटर अॅल्युमिनिअमची तार व दोन पोल चोरून नेले आहेत.