नागपूर शहर: एमडी तस्करी प्रकरणात चार आरोपींना अटक : सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 20 ऑगस्टला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोलिंग दरम्यान कपिल नगर पोलिसांनी एमडी तस्करी प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन दुचाकी, एमडी, व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.