कामठी: गुन्हे शाखेकडून देशी बनावटीच्या पिस्तूलसह आरोपीला अटक,आरोपीला नवीन कामठी पोलिसांच्या करण्यात आले सुपूर्द
Kamptee, Nagpur | May 15, 2026 शहर गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या पथकाने नवीन कामठी परिसरात कारवाई करून एका आरोपीला बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.याप्रकरणी ईरफान हुसेन शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक काळ्या रंगाची देशी बनावटीची पिस्तूल (मॅग्झिनसह) आणि दोन जिवंत काडतूस, ज्याची एकूण किंमत अंदाजे *५६,००० रुपये जप्त करण्यात आले आहे.आरोपी कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगून होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.