जाफराबाद: जिल्हा परिषद परिसरामध्ये झालेल्या जेलभरो आंदोलनात माहोरा सिपोरा,अंभोरा येथील पदाधिकारी व कामगारांनी घेतला सहभाग
आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरासह तालुक्यातील सिपोरा आंबोरा, माहोरा यासह ग्रामीण भागातील शेकडो कामगार अंगणवाडी सेविका पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जालना येथे झालेल्या सि. टू. या सामाजिक संघटनेच्या जेलभरो आंदोलनामध्ये सहभाग घेतला असल्याचे पाहायला मिळाले आहे,यामध्ये शेतकरी विद्यार्थी यांच्या अडीअडचणी घेऊन हे जेल वरून आंदोलन आज करण्यात आली असून जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनास पार पडले.