अंबरनाथ: बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने जल्लोष
बदलापूर येथील एका शाळेमध्ये अक्षय शिंदे नावाच्या आरोपीने दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. 23 सप्टेंबर रोजी ठाण्याकडे आरोपीला घेऊन येत असताना आरोपीने बंदूक हिसकावून गोळीबार केला त्यावेळी पोलिसांनी संरक्षणासाठी आरोपीचा एन्काऊंटर केला. या एन्काऊंटर नंतर बदलापूर येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फटाके वाजवून, एकमेकांना मिठाई भरून जल्लोष साजरा करण्यात आला. खऱ्या अर्थाने बदलापूर मधील चिमुरड्यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी दिल.