अंबरनाथ: बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का? भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ
बदलापूरचा नराधम ठार झाला, त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात, किती दुटप्पीपणा? अशी प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास व्यक्त केलीय. आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करीत असेल तर काय त्याची आरती करायची? बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का? राजकारण करणार्यांना या विरोधकांना लाज वाटली पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.