उरण: बोकडवीरा वीजनिर्मिती प्रकल्पाजवळील उड्डाणपूल धोक्यात
Uran, Raigad | Apr 19, 2026 उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाजूला असलेला उड्डाणपूल अस्तित्व टिकवण्यासाठी आधाराची वाट पाहत उभा आहे. पाच वर्षांपूर्वी अवजड वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मालाचे कंटेनर वेळेत बंदरात पोहोचवण्यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र आजघडीला हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून वाहनचालक व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.