शेगाव: एका बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या ७ जणांना शेगाव शहर पोलिसांनी जय अंबेनगर येथे पकडले
एका बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या ७ जणांना शेगाव शहर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान जय अंबेनगर येथे पकडले.व त्याच्या ताब्यातून ७७ हजार ५० रुपयाचा जुगार साहित्य मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे . शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेका संतोष गवई यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जय अंबेनगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जणांना पकडले.