काटोल: कोंढाळी पोलिसांची कारवाई: अवैध दारू वाहतूक करणारा जेरबंद
Katol, Nagpur | Apr 20, 2026 कोंढाळी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी सुनील किसन चव्हाण (वय २८, राहणार पुसागोंदी) याला अटक केली.पोलिसांनी त्याच्याकडून ५० देशी दारूच्या बाटल्या (किंमत २,००० रुपये) आणि एक मोटारसायकल असा एकूण ५७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.