काटोल: काटोलच्या विकासाला नवी गती; ५५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
Katol, Nagpur | Apr 3, 2026 शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करत, काटोल नगरपरिषदेत सुमारे ५५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार चरण सिंग ठाकूर हस्ते उत्साहात पार पडले. पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर झाला होता याप्रसंगी आमदार चरण सिंग ठाकूर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या.