*महाराष्ट्रातील नागरिकांना आता १३५६ ऐवजी २३९९ आजारांवर मिळणार मोफत उपचार, नवीन संगणक प्रणालीचा (TMS 2.0) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ!
112 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 24, 2026 *महाराष्ट्रातील नागरिकांना आता १३५६ ऐवजी २३९९ आजारांवर मिळणार मोफत उपचार, नवीन संगणक प्रणालीचा (TMS 2.0) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ!* राज्यातील जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्याच्या क्षेत्रात राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. “आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” आणि “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना” या दोन महत्त्वपूर्ण योजनांचे एकत्रीकरण अधिक सक्षमपणे करण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते TMS 2.0 (Transaction Management System) प्रणाली ची सुरुवात आज करणेत आली.