लातूर: ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनचा हरित उपक्रम कायम जोमात
श्रमदानातून ८५० झाडांना पाणी, नवीन २० झाडांचे वृक्षारोपण
Latur, Latur | Nov 21, 2025 लातूर शहरात हरित क्रांती घडवण्याच्या उद्दिष्टाने सातत्याने कार्यरत असलेल्या ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन तर्फे दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजीही पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या श्रमदानात थंडीची पर्वा न करता सदस्यांनी तब्बल साडेतीन तास मनापासून सेवा दिली.