नागपूर शहर: आयटी पार्कमधील स्ट्रीट व्हेंडरकडून हफ्ता वसुली करणारा आरोपी अटकेत: पंकज बोडसे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोडसे यांनी 20 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार,प्रताप नगर पोलिसांनी आयटी पार्क परिसरात स्ट्रीट व्हेंडरकडून हफ्ता वसुली करणाऱ्या एका गुन्हेगाराला अटक केली आहे. मोहित उर्फ चन्ना पंचेश्वर असे या आरोपीचे नाव आहे.आरोपी मोहितने आयटी पार्क येथील एका स्ट्रीट व्हेंडरकडे १०,००० रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती आणि त्याच्याकडून बळजोरीने ५०० रुपये वसूल केले होते. याबद्दलची अधिक माहिती पंकज बोडसे यांनी दिली आहे.